युतीचा निर्णय लवकरच कळवू; मुख्यमंत्री फडणवीस

0

मुंबई : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली तरी अद्याप भाजप- शिवसेना युतीची अधिकृत घोषणा झालेली नाही. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मलाही युतीची चिंता आहे, असे म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद आज दुपारी १२.३० वाजता भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित केली होती. यावेळी पत्रकारांनी युतीबाबत विचारले असता त्यांनी, युतीचा निर्णय लवकरच कळविला जाईल, असे सांगितले.  यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्पोरेट टॅक्स कपातीचा निर्णय महाराष्ट्रासाठी फायद्याचा असल्याचा दावा केला. या निर्णयामुळे गुंतवणूक वाढेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. पुढील महिन्यात होणार्‍या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेचेच सरकार पुन्हा सत्तेवर येईल, असा आत्मविश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केला होता. ही विधानसभा निवडणूक आम्ही शिवसेनेसोबत युती करूनच लढवणार आहोत, असे त्यांनी म्हटले होते, सेनेसोबत आमची बोलणी सुरू आहे. शिवसेनेला आम्ही कोणत्याही अटी शर्ती घालत नसतो. आम्ही मित्र आहोत. आम्ही आमचे निर्णय एकत्रितपणे घेतो. दोन्ही पक्षांमध्ये इच्छूक उमेदवारांची संख्या मोठी आहे आणि अखेरच्या क्षणापर्यंत या इच्छूकांचे समाधान करण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे त्यांनी नमूद केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here