आपची पहिली यादी जाहीर; आठ जागांवर उमेदवारांची घोषणा

0

मुंबई : विधानसभेसाठी युती, आघाडीतील जागावाटपाची चर्चा सुरू असताना छोट्या छोट्या पक्षांनी उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यास सुरूवात केली आहे. एमआयएमने दोन याद्या जाहीर केल्या. आज आम आदमी पक्षाने आठ जागांवर उमेदवारी जाहीर केली आहे. ब्रम्हपुरी विधानसभेसाठी पारोमिता गोस्वामी, जोगेश्वरी पूर्वसाठी विठ्ठल लाड, करवीरसाठी आनंद गुरव, नांदगावसाठी विशाल वडघुले, कोथरूडसाठी अभिजित मोरे, चांदिवलीतून सिराज खान, दिंडोशीतून दिलीप तावडे आणि पर्वतीमतदारसंघातून संदीप सोनावणे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. 
यावेळी आपने राज्य सरकारवर टीका केली. राज्यात सरकारच दिसत नाही. सुशासनाचा वायदा करणाऱ्यांनी अख्खा महाराष्ट्र खड्डयात टाकला आहे. राज्यात विरोधकाच नाहीत. सगळे भाजपमध्ये गेल्याचे आपचे महासचिव धनंजय शिंदे यांनी सांगितले. जनतेच्या प्रश्नावर गेली पाच वर्ष सातत्याने संघर्षाची भूमिका घेतली. आता, जनतेचा आवाज विधानसभेत पोहचविण्यासाठी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. ६०० अर्ज आले. त्यांच्या मुलाखती, छाननी केली. ५० ते ५५ ठिकाणी सक्षम उमेदवार आपकडे आहेत. एकीकडे राज्यात नेत्यांची पळवापळवी सुरू असताना उमेदवार जाहीर करणारा आप पहिला पक्ष असल्याचा दावा शिंदे यांनी केला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here