आगरनरळ येथे शेतात लावलेल्या फासकीत अडकला बिबट्या

0

रत्नागिरी : तालुक्यातील आगरनरळ येथील वासुदेव गोताड यांच्या शेतामध्ये लावलेल्या वायररोपच्या फासकीमध्ये अडकून पडलेल्या बिबट्याची वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी मुश्कील परिस्थीमध्येही सुटका केली व त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले. बुधवारी सकाळी हा प्रकार लक्षात येताच तातडीने याची माहिती जयगड पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी वनविभागाला याची माहिती दिल्यानंतर रत्नागिरीच्या परिक्षेत्र वनाधिकारी प्रियंका लगड यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. रत्नागिरीचे विभागीय वनाधिकारी दीपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी व लांजा तालुक्यातील वनरक्षकांनी बिबट्याला पिंजर्‍यात बंद केले. त्यानंतर त्याला सह्याद्रीच्या डोंगराळ भागात नैसर्गिक अधिवासात सुखरुप सोडण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:58 AM 31-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here