सुरक्षा रक्षकांचे आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण

0

सुरक्षा रक्षकांचे प्रलंबित मागण्या मान्य करून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटना अध्यक्षा. मा. सौ. अश्विनीताई अनिल सोनावणे व सर्व पदाधिकारी तसेच सर्व मिञपक्ष संघटना दिनांक 05/01/2021रोजी सकाळी 10:00 वाजता उपोषणास बसणार आहेत. जो पर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तो पर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा इशारा अश्विनीताईंनी दिला आहे. तरी उपोषणादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार मा.कामगार मंत्री, मा.मुख्यमंत्री, मंडळाचे संदर्भीय अधिकारी तसेच कार्यासन अधिकारी हे असतील, अशी माहिती सुरक्षा रक्षक न्याय संघटना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हाअध्यक्ष स्वप्निल चौगुले यांनी दिली. राज्यातील 15 सुरक्षा रक्षक मंडळे एकत्रीकरण करून एकच सक्षम मंडळ व्हावे, सुरक्षा रक्षकांना लष्करी दर्जाप्रमाणे वर्दी मिळावी, भविष्य निर्वाह निधी हा भविष्य निर्वाह खात्यातच जमा व्हावा, सर्व सुरक्षा रक्षक मंडळातील टी टेम्पररी हे नाव काढून त्यांना कायमस्वरूपी नोंदणी क्रमांक मिळावेत, ग्रामीण रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांचे थकीत वेतन अदा करावे, अशा सुरक्षा रक्षकांच्या प्रलंबित मागण्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:20 PM 31-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here