लांजा ग्रामीण रुग्णालय इमारतीसाठी १५ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर

0

लांजा : लांजा ग्रामीण रुग्णालयाची जीर्ण व दुरवस्था झालेली इमारत आता मोकळा श्वास घेणार असून या रुग्णालयाच्या नव्या इमारतीच्या बांधकामाचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. या नवीन इमारत उभारणीसाठी १५ कोटी ८० लाखांच्या निधीला राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने तत्वतः मान्यता दिली आहे. लांजा ग्रामीण रुग्णालयाची इमारत नवीन बांधण्यासाठी तत्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार राजन साळवी यांनी केली होती. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लांजा ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीसाठी १५ कोटी८० लाखांच्या निधीला तत्वतः मान्यता दिली. लांजा ग्रामीण रुग्णालयाची ही नवीन इमारत तीन मजली होणार असून १०,००० चौरस फूट इतक्या प्रशस्त जागेमध्ये ५० बेड सह अद्ययावत यंत्रणा या इमारतीमध्ये उपलब्ध होणार आहेत. लवकरच तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यावर या इमारतीच्या बांधकामाची निविदा देखील प्रसिद्ध होणार आहे. लांजा ग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारत मंजूर झाल्याने इमारतीच्या बांधकामानंतर लांजा तालुक्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

HTML tutorialLEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here