ग्रा. पं. निवडणूक आचारसंहितेमुळे जानेवारीचा लोकशाही दिन रद्द

0

रत्नागिरी : जिल्हास्तरावर दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. सद्यस्थितीत जिल्हयात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020-21 ची प्रक्रिया चालू असल्याने जिल्हयात आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. ज्या ज्या क्षेत्रांमध्ये निवडणूकीकरिता आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे अशा ठिकाणी त्या स्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येऊ नये असे नमूद केले आहे. यास्तव जानेवारी 2020 चा जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा करण्यात येणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी असे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांनी कळविले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:43 PM 31-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here