उद्या होणार युतीची घोषणा

0

भाजप – शिवसेना युतीचं घोंगड गेले अनेक दिवस भिजत पडल आहे. मात्र उद्या युतीची घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे उद्या म्हणजेच 24 सप्टेंबरला संयुक्तपणे पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा करणार आहेत.

HTML tutorial

युतीच्या जागावाटपावरून भाजप – शिवसेनेत वाटाघाटी सुरु होत्या. मात्र अखेर दोन्ही पक्षांनी एकमताने निर्णय घेऊन युतीचा फॉर्म्युला अंतिम केला आहे. त्यामुळे उद्या देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे स्वतः पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान शिवसेनेकडून समाधानकारक प्रस्ताव येत नसल्यामुळे भाजपही अडून बसला आहे. लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने नमती भूमिका घेत शिवसेनेला अतिरिक्त जागा सोडली होती. तसेच कोकणातील नाणार प्रकल्पही रद्द केला होता. त्यामुळे आता शिवसेनेने राजकीय वस्तुस्थितीचा विचार करून भूमिका घ्यावी, अशी भाजपची अपेक्षा आहे. त्यानुसार भाजपकडून 105/165 असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here