अंगणात पार्क केलेली दुचाकी लांबवली

0

रत्नागिरी : शहरानजीकच्या कोकणनगर येथील घराच्या अंगणातून ३० हजार रुपये किमतीची दुचाकी लांबवल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत हुसेन दस्तगिर शेख (२६,रा, कोकणनगर,रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. मंगळवारी रात्री त्यांनी आपली होंडा शाईन दुचाकी (एमएच-०८-एक्स-६९९७) घराच्या अंगणात पार्क केली होती. बुधवारी सकाळी ते घराबाहेर आले असता त्यांना आपली दुचाकी अंगणात आढळून आली नाही. त्यांनी आजुबाजूला शोध घेतल्यानंतरही दुचाकी आढळून न आल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:50 AM 01-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here