दिव्यांग प्रमाणपत्र तपासणीसाठी जिल्हा रुग्णालय रत्नागिरीतर्फे मार्गदर्शक सूचना

0

रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग प्रमाणपत्र तपासणीसाठी येताना खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना करण्यात येत आहेत:

◼️ दिव्यांग तपासणीसाठी येताना फक्त 1 नातेवाईकांस प्रवेश देण्यात येईल. कोव्हिड 19 बाधित रुग्ण संख्येचा विचार करता प्रत्येक दिव्यांगाने स्वतःच्या आरोग्य सुरक्षेस प्राधान्य देऊन अत्यावश्यक असलेसच प्रवास करावा.
◼️ तपासनीस येणे पूर्वी आपणास सोबतच्या नातेवाईकास कोव्हिड सदृश्य आजार नसल्याची खात्री करावी नाक व तोंड पूर्ण झाकेल असा मास्क व सुरक्षित अंतर सर्वाना बंधनकारक आहे.
◼️ सर्व दिव्यांग व सोबतच्या नातेवाईकांची कोव्हिड सदृश्य लक्षणांची तपासणी झाल्यावरच अंतिम दाखल्यासाठी प्रवेश मिळेल.
◼️ दिव्यांग तपासणी शासकीय कामाचे दिवशी आठवड्याच्या दर बुधवारी आणि शुक्रवारी दिव्यांग विभाग जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे करण्यात येईल.दर बुधवारी फक्त 5 कर्णबधिर व फक्त 5 दृष्टिदोष , 10 अस्थिव्यंग दिव्यांगांची तपासणी होईल. दर शुक्रवारी फक्त 5 दृष्टिदोष व 5 कर्णबधिर, 10 मानसिक (मतिमंद) व 10 बहुविकलांग दिव्यांगांची तपासणी होईल. ◼️कर्णबधीर रुग्णांना आवश्यक बेरा (BERA) चाचणी जिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहे.
◼️ दिव्यांगांनी तपासनीस येण्यापूर्वी आपल्या दिव्यांगतवानुसार खालील क्रमांकावर अपॉईंमेंट घेऊनच यावे प्रत्येक दिव्यांगत्वानुसार फक्त 10 रुग्णांना प्रवेश मिळेल.
◼️ दर बुधवार कर्णबधिर दृष्टिदोष अस्थिव्यंग दिव्यांग यांच्या अपॉइंटमेंट साठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5 हेल्प डेस्क क्रमांक 02352226060 यावर संपर्क साधावा.
दर शुक्रवारी दृष्टिदोष ,कर्णबधिर ,मानसिक मतिमंद ,बहुविकलांग दिव्यांग अँपॉईंमेंट साठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5 हेल्प डेस्क क्रमांक 02352226060 यावर संपर्क साधावा.
अँपॉईंमेंट न घेता आल्यास कोणाचीही तपासणी होणार नाही.
◼️ दिव्यांगांनी तपासनीस येण्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करून त्याची प्रिंट आऊट , आधार कार्ड व रेशन कार्ड यांची झेरॉक्स घेऊन यावे हे आवश्यक आहे.त्याच बरोबर जर जुने दिव्यांग प्रमाणपत्र असेल तर त्याची मूळ प्रत घेऊन यावी.हॉस्पिटल मधून डिस्चार्ज दिल्यानंतर मिळणारे डिस्चार्ज कार्ड, आजाराची सर्व कागदपत्रे , उपचारांची फाईल, एक्सरे रिपोर्ट्स आणणे आवश्यक आहे.
◼️ जर शासकीय नोकरीत असेल तर सक्रिय नोकरीत असले संबंधीचे विभाग प्रमुखाचे दिव्यांग तापसणीसाठीचे पत्र सोबत आणणे आवश्यक आहे .
◼️ अधिक माहितीसाठी दिव्यांग विभागातील भौतिकउपचार तज्ञ श्री .नितीन चौके व अमित वायगंणकर यांचेशी वैयक्तिक संपर्क साधावा.www.swavlambancard.gov.in या प्रणालीवर ऑनलाईन अर्ज करावा.
अपॉईंमेंट पद्धतीने तपासणीची सुरवात दिनांक 1 जानेवारी 2021पासून होईल. याची नोंद घ्यावी, असे जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी तर्फे कळविण्यात आले आहे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:24 PM 01-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here