सन २०२१ चे स्वागतासाठी स्वामी स्वरुपानंद सहकारी पतसंस्थेची नववर्ष स्वागत ठेव योजना सुरु

0

रत्नागिरी : सन २०२१ या नवीन वर्षाचे स्वागतासाठी स्वामी स्वरुपानंद सहकारी पतंसस्थेने प्रतिवर्षाप्रमाणे नववर्ष स्वागत ठेव योजना घोषित केली आहे. या नववर्षाच्या स्वागत ठेव योजनेत १५ ते १८ महिने मुदतीच्या स्वरुपांजली ठेव योजनेत सर्वसामान्य ठेवीदारांसाठी ७.१५% ज्येष्ठ नागरिक व महिला ठेवीदारांसाठी ७.३०% तर १९ ते ३६ महिने मुदतीच्या सोहम ठेव याजनेत सर्वसामान्य ठेवीदारांसाठी ७.००% व ज्येष्ठ नागरिक व महिला ठेवीदारांसाठी ७.१०% एवढा व्याजदर घोषित केला आहे. आज अखेर संस्थकडे रुपये २१८ कोटींच्या ठेवी जमा असून चालू आर्थिक वर्षात रु.१७ कोटींच्या ठेवी वाढल्या आहेत. कोरोनाची परिस्थिती असुनही हे ठेववाढीचे प्रमाण लक्षणीय आहे. वाढत्या ठेवींबरोबर कर्जव्यवहार व गुंतवणूकांमध्येही वाढ झालेली असून संस्थेचा स्वनिधी २६ कोटी ८७ लाखापर्यंत पोचला आहे. सी.डी. रेशो ही योग्य प्रमाणात राखला आहे. संस्थेने ठेवींची सुरक्षितता, विश्वासार्हता याला अनन्य साधारण महत्त्व देऊन गेली २९ वर्षे मार्गक्रमण केले. जनमानसात स्वामी स्वरुपानंद पतसंस्थेबद्दल असलेली स्वच्छ प्रतिमा ग्राहकांचा स्नेह, विश्वास या बळावर संस्थेची वाटचाल अधिक उत्तम पध्दतीने मार्गस्थ होत आहे. संस्थेच्या पावस, जाकादेवी, खंडाळा, कुवारबाव, चिपळूण, पाली, साखरपा, नाटे, मालगुंड, लांजा, राजापूर, पुणे कोथरुड, देवगड जामसंडे, देवरूख व रत्नागिरी शहरामध्ये मारुती मंदीर व कोकण नगर अशा शाखा असून या शाखामध्ये या योजनेचा लाभ मिळू शकतो.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:50 PM 01-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here