होय नाही म्हणत आज अखेर ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा होती. पण नारायण राणेंना भाजपने पुन्हा एकदा धक्का दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज राणेंचा प्रवेश होण्याची चर्चा होती. मात्र, कोणताही प्रवेश होणार नसल्याची माहिती भाजप कडून देण्यात आली आहे.
दरम्यान नारायण राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा सावंतवाडीत मेळावा घेऊन भाजपा प्रवेशाची कल्पना दिली होती. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आठ दिवसात आपला प्रवेश होणार असल्याचं म्हटलं होतं.
परंतु राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबतची चर्चा गेले दीड-दोन महिने सुरू होती. मात्र त्यांच्या भाजप प्रवेशाचा गुंता अजून ही कायम आहे. कारण भाजप कडून त्यांना आज धक्का देण्यात आला आहे. कारण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राणेंचा प्रवेश होणार होता. परंतु तो आता टळला आहे.
