रत्नागिरी : सातत्याने सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या रत्नागिरी खबरदारच्या whatsapp ग्रुपने सौ गोदुताई जांभेकर विद्यालयातील ४७ गरीब व होतकरू विद्यार्थ्यांची १० वी ची फी भरून आपल्या सामजिक कार्यात सातत्य राखलं आहे. रत्नागिरी खबरदारच्या ४७ सभासदांनी प्रत्येकी एक याप्रमाणे या ४७ विद्यार्थ्यांच्या फी ची जबाबदारी उचलली. रत्नागिरी खबरदार whatsapp ग्रुपच्या सदस्यांनी आजवर लाखो रुपयांची मदत गरजूंना केली आहे. अनेक सामजिक कार्यात देखील खबरदार ग्रुपचा हिरहिरीने सहभाग असतो. सौ. गोदुताई जांभेकर विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी याबाबत खबरदारच्या सदस्यांना कळवताच शाळेतील सर्वच गरीब विद्यार्थ्यांची फी भरण्याचे ठरवण्यात आले व अवघ्या दोन दिवसात हि फी गोळा करून शाळेकडे देण्यात आली. खबरदारचे सभासद अमोल डोंगरे व सौ श्रद्धा गांगण यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक श्री चव्हाण यांच्याकडे हि फीची रक्कम सुपूर्द करण्यात आली. यावेळी रत्नागिरी खबरदारचे संपादक हेमंत वणजु, सभासद मिलिंद दळी हे उपस्थित होते. खबरदार ने या केलेल्या मदतीमुळे शाळेकडून व विद्यार्थ्यांकडून सर्व सभसदांचे आभार मानण्यात आले. रत्नागिरी खबरदार ग्रुपच्या वतीने जमा करण्यात आलेल्या या मदतकार्यात पुढील सभासदांनी आपला सहभाग नोंदवला. हेमंत वणजु, ब्रिजेश साळवी, मकरंद खातू, सौ. अल्पना संसारे, सौ. कोमल तावडे, सौ. श्रद्धा गांगण, प्रसन्न पेठे, केतन पवार, मिलिंद दळी, प्रणव पोळेकर, दीपक पवार, वीरेंद्र वणजु, प्रथमेश रेडीज, कुणाल शेरे, गणेश धुरी, बापु बेर्डे, अमरेश पावसकर, उमेश मलूष्टे, सचिन भिंगार्डे, गौतम बाष्टे, गुरुदेव दत्त, अभिजित गोडबोले, सौरभ मलुष्टे, विनू मलुष्टे, संजू फळणीकर, एन् व्ही भादुले, किरण सामंत, आ. उदय सामंत, रवींद्र सामंत, स्वरूप जालीसतगी, बाबा भिंगार्डे, समीर सावंत, मुकेश गुंदेचा, सिद्धार्थ बेंडके, अनिल जोशी, अमोल डोंगरे, मुन्ना देसाई, योगेश मलुष्टे, मिलिंद पावसकर, विलास संसारे, मनीष मोरे, सचिन शेट्ये, बाबूशेठ म्हाप, शेखरशेठ म्हाप, निलेश शा. मालूष्टे, निमेश नायर, रवींद्र वणजु
