पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात स्वीकारार्ह नेते, मॉर्निंग कंसल्ट सर्व्हेचा दावा

0

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पातळीवर पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वाचा डंका वाजवला आहे. जगभरातील नेत्यांच्या कार्यकाळातील स्वीकृतीवर नजर ठेवणाऱ्या डाटा फर्मच्या सर्वेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी ५५ टक्के स्वीकृती रेटिंगसह सर्वात वरच्या क्रमांकावर आहेत. मॉर्निंग कन्सल्ट नावाच्या फर्मच्या नव्या सर्वेनुसार सुमारे ७५ टक्के लोकांनी मोदींना पाठिंबा दिला आहे. तर २० टक्के लोकांनी मोदींना विरोध केला. त्यामुळे मोदींची एकूण स्वीकृती रेटिंग ही ५५ टक्के राहिली. याच प्रकाराचे जर्मनीच्या लोकप्रिय चांसलर एंजेला मार्केल यांची स्वीकृती रेटिंग २४ राहिली. तर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची स्वीकृत रेटिंग नकारात्मक राहिली. याचा अर्थ त्यांना पाठिंबा देणाऱ्यांपेक्षा विरोध करणाऱ्यांची संख्या अधिक होती. भारतातील सर्वेदरम्यान घेण्यात आलेल्या सॅम्पलचा आकार दोन हजार १२६ एवढा राहिला आणि यामध्ये त्रृटीची शक्यता २.२ टक्के राहिली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:53 PM 01-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here