चिखली ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध

0

माखजन : संगमेश्वर तालुक्यातील कडवई विभागातील चिखली ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. स्थानिक गावपॅनेलच्या माध्यमातून नवनिर्वाचित नऊ सदस्य निवडले गेल्याने हि निवडणूक बिनविरोध झाली. पंचायत समितीच्या उपसभापती सौ. प्रेरणा कानाल यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामस्थांच्या सहकार्यतून गाव पॅनल एकत्र आल्याने हि सदस्य निवड बिनविरोध झाली. नगरपरिषदेचे डी. बी. शिंदे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. १९५६ पासून आज अखेर हि ग्रापंचायत आजतागायत बिनविरोध होत आहे. बिनविरोध नवनिर्वाचित सदस्य ममता साळुंखे, सारिका पाले, विजय धनावडे, सचिन कदम, ओजस्वी पंडव, शिवानी लाखन, साजिदा मुल्लाजी, मैथिली कानाल, मारुती धामणाक यांची निवड झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:21 PM 01-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here