“जगण्यातून आनंद आणि आनंदातून जगणं”, ”नव्या वर्षाच्या आभाळभर शुभेच्छा”

0

✍️ अँड विलास पाटणे

➡ गेल्या आठवड्यात बाबासाहेब पुरंदरे यांची भेट झाली. शंभरीच्या उंबरठयावर बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता व लहान मुलाचा निरागसपणा, डोळयात अपार स्नेहभाव, सतेज कांति आणि शब्दातील उर्जा पाहून थक्क व्हायला होते. एका मुलाखतीत करोनाचा संदर्भ देत बाबासाहेब म्हणाले होते, ‘मानव जातीवर अशी अनेक संकटे यापूवीही आलेली आहेत. मी स्वत: प्लेगच्या साथी अनुभवल्या. ‘स्वाइन फ्लू’ पाहिले. प्रत्येक वेळी काळजी घेतली, पण भीतीने पछाडले असे कधी झाले नाही आणि तसे होऊही दिले नाही.
जगण्यावरचे प्रेम, श्रद्धा निरंतर असू द्या. त्यातली ऊर्जा प्रवाही ठेवा. असे केले तरच ते जगण आनंदी होईल.’
बाबासोा म्हणतात, ‘तुम्ही कितीही मोठे व्हा, तुमच्यात लपलेल्या छोटया मुलाला जिवंत ठेवा. मी आजही या वयात जेवढा गंभीर, चिंतनशील, स्थितप्रज्ञ वाटतो तेवढाच खोडकर, आणि दंगेखोर देखील आहे. मी जसे वाचन-संशोधन करतो तसेच पत्तेही खेळतो.. आनंदाने जगणे ही देखील एक कला आहे.
“कशाचीही भीती बाळगू नका. संकटे येणार, ती चुकणार नाहीत, जगणे सुसह्य होईल. “मी एवढय़ा प्रदीर्घ आयुष्यात एकदाही आजारी पडलो नाही. याचे रहस्य माझ्या शरीरापेक्षा या विचारांमध्ये असावे “
” आजवर सतत आनंदी, सकारात्मक आणि कार्यमग्न राहिलो. माझा भवतालही सतत आनंदी ठेवला. या प्रदीर्घ वाटचालीचे श्रेय कदाचित या ‘चैतन्यालाच असेल “,

उद्याचा सूर्य नवीन स्वप्न घेवून येईल, परंतु श्रध्देय बाबासाहेबानी दिलेला निरोगी आयुष्याचा मंत्र पाळू या
स्विकार –क्षमा –प्रेम –कृतज्ञता –सकारात्मकता
आणि त्यातून आनंद,
सर्वाना नव्या वर्षाच्या आभाळभर शुभेच्छा

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:07 AM 02-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here