विलवडे मार्गावर पडलेल्या मोठ्या भगदाडात कार अडकली

0

बांदा ः बांदा कट्टा कॉर्नर येथील विलवडे मार्गावर मोठे भगदाड पडून त्यात चारचाकी अडकल्याने एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी ही चारचाकी बाहेर काढली. मात्र हे मोठे भगदाड आता अपघातांना निमंत्रण देणारे ठरणार आहे. दरम्यान, सरपंच अक्रम खान, जि. प. सदस्या श्‍वेता कोरगावकर यांनी याठिकाणी पाहणी करत सुरक्षेततेचे उपाय करत रस्त्यावरून वाहनांना सतर्कतेचा इशारा दिला.  महामार्गाचे चौपदरीकरण करताना बांदा-आंबोलीकडे जाण्यासाठी पर्यायी सर्व्हिस रोड तयार करून देण्यात आला होता. मात्र हे काम  निकृष्ट असल्याचे  या घटनेवरून दिसून येत आहे. या मार्गावर पूर्वीपासून असलेला ओहोळावरच हा रस्ता बांधण्यात आला. मात्र या कामात दर्जा राखण्यात न आल्याने हे भगदाड पडलं आहे. सुमारे दहा फूट खोल लांबीचा हा खड्डा मुख्य वळणावरच पडल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. सोमवारी सकाळी अचानक भूस्सखलन व्हावे त्याप्रमाणे कारसह रस्ता कोसळला. काही वेळ काहीच कळेना. मात्र नंतर रस्ता खचून सुमारे दहा फूट खोल भगदाड पडल्याचे निदर्शनास आले. सोमवारी आठवडा बाजार असल्याने स्थानिकांनी खड्ड्यात फलक लावून वाहनचालकांना सतर्क केले. महामार्ग विभागाने हा रस्ता बनविल्याने रस्ता सुरळीत करण्याची जबाबदारी त्यांचीच असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here