आणि काही मिनिटातच गाईला मिळाले जीवदान

0

रत्नागिरी : शिवाजी नगर शासकीय वसाहत येथील शौचालयाच्या टाकीत गाय पडल्याचे येेेथील शासकीय कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. सर्वत्र संपर्क साधून कुठून ही तत्काळ मदत मिळेल अशी यंत्रणा उपलब्ध झाली नाही. अशावेळी घटनास्थळी असलेल्या बेंडखळे यांनी रत्नागिरीतील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते सौरभ मलुष्टे यांना संपर्क साधला.
सौरभ मलुष्टे यांनी क्षणाचादेखील विलंब न लावता त्यांचे मित्र स्वप्नील पाथरे, महेंद्र कारेकर आणि जेसीबी ऑपरेटर श्रीकांत जाधव यांना सोबत घेतले. जेसीबीच्या साहाय्याने तत्काळ गाईला शौचालयातून बाहेर येण्यासाठी मार्ग तयार करण्यात आला. गायीला टाकीतून बाहेर काढून तिला जीवनदान देण्यात आले. त्यांनी केलेल्या मदती मुळे गाईचा जीव वाचला. या कामगिरीबाबत वसाहतीतल्या सर्व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
06:41 PM 02/Jan/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here