मुंबई : मुंबई राष्ट्रवादीला आज जबर हादरा बसला. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी राष्ट्रवादीला रामराम करत शिवसेनेशी घरोबा केला. दरम्यान, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी पक्षाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांची निवड करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काही दिवसाचांच कालावधी राहिला असताना काँग्रेससह आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही पक्षाला रामराम करण्यास सुरूवात केली आहे. आज मुबंई राष्ट्रवादीला मोठे भगदाड पाडत सचिन अहिर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेला मुंबईतून मोठी ताकद मिळाली आहे. अहिर यांनी राष्ट्रवादी सोडल्याने मुंबई राष्ट्रवादी अध्यक्षपदी नवाब मलिक यांची वर्णी लागली आहे.
