रत्नागिरीत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अधिकारी, लोकप्रतिनिधींनी घेतली हरित शपथ

0

त्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पर्यावरण संतुलनासाठी व रक्षणासाठी ‘माझी वसुंधरा’ या अभियानाला प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली असून, शुक्रवारी अभियानांतर्गत रत्नागिरी जिल्हा परिषद, जिह्यातील पंचायत समित्या व ग्रामपंचायतींमध्ये हरित शपथ घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या छ.शिवाजी महाराज सभागृहात अधिकारी व कर्मचारी यांना जि.प.अध्यक्ष रोहन बने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदीनी घाणेकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत हरित शपथ देण्यात आली. यावेळी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तर पंचायत समिती कार्यालयांमध्ये गट विकास अधिकारी, ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक व सरपंच यांनी शपथ दिली.

माझी वसुंधरा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांच्या मार्पत पशासनाला सूचना करण्यात आल्या आहेत. शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘माझी वसुंधरा’ अभियांनातर्गंत जिह्यातील कडवई, सावर्डे, हर्णै, पाजपंढरी या चार ग्रामपंचायतींची पथम निवड करण्यात आली आहे. जितक्या महिला तितकी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. अभियानात अभियानांतर्गंत पंचतत्त्वाशी संबंधित घटकांवर काम केले जाईल. त्यामध्ये पृथ्वी घटकासाठी वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी, जमिनीचे धुपीकरण थांबवणे, या मुद्याशी संबंधित कामे केली जाणार आहेत. या अभियानाची जिह्यात तयारी सुरू झाली आहे. निवडण्यात आलेल्या ग्रामपंचायतींमध्ये कामे सुरू करण्यात येणार आहेत. गावांचे गाव कृती आराखडे तयार करून त्यानुसार अंमलबजावणी करण्यात येणार आहे. योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य, महिला बचतगट, ग्रामस्थ, सामाजिक संस्था, पर्यावरण स्नेही, शिक्षक, विद्यार्थी तसेच विविध घटकांनी योजनेत सहभाग नोंदवण्यासाठी आवाहन केले जाणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:41 PM 04-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here