अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकास ६ महिने कैद व दंड

0

रत्नागिरी : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत तिला शहरातील एका भागात अडवून माझे तुज्झावर प्रेम आहे तू माझ्याशी लग्न करशील का अशी विचारणा करीत अल्पवयीन मुलीचा भर रस्त्यात हात पकडून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी न्यायालयाने रिक्षाचालकाला ६ महिने कैद २० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. शहरातील एका गजबजलेल्या परिसरातून निघालेल्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करण्यात आला होता. ही घटना २२ जुलै २०१८ ला घडली होती. सुभाष श्रीधर मयेकर (वय-३७ रा . मुरुगवाडा रत्नागिरी )यांनी एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत शहरातील एका रस्त्यावर तिला अडवून माझं तुझ्यावर प्रेम आहे तू माझ्याशी लग्न करशील का? अशी विचारणा करून त्या मुलीचा भर रस्त्यात हात पकडला होता. त्यावेळी त्या अल्पवयीन मुलीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले होते. ही घटना त्या मुलीने आपल्या घरच्यांना सांगितल्याने हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पीडित तरुणीने शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली होत.हा तपास पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण व सुप्रिया बगडे यांनी करून यातील सुभाष श्रीधर मयेकर (वय-३७ रा . मुरुगवाडा रत्नागिरी )या रिक्षा चालकाविरोधात शहर पोलिसांनी भा.दं.वि.क ३५४, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम२०१२ चे कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता… हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच त्यावर अतिम सुनावणी होऊन न्यायालयाने सुभाष मयेकर यांना ६ महिने साधी कैद व २० हजार रुपये दंड,दंड न भरल्यास २ महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. खटल्यात चार साक्षिदार तपासण्यात आले. सरकारी वकील अनिरुद्ध फणसेकर यांनी काम पाहिले. तर पैरवी म्हणून महिला पोलिस सोनाली शिंदे यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here