पोलिसांना अचल संपत्ती जप्त करण्याचा अधिकार नाही

0

नवी दिल्ली : गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना अचल संपत्ती जप्त करण्याचा अधिकार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालास आव्हान देणार्‍या राज्य सरकारच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला. मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्ण खंडपीठाने भारतीय दंडविधान संहितेच्या कलम १०२ अन्वये प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना अचल संपत्ती करण्याचा अधिकार नाही, असा निकाल दिला होता. राज्य सरकारने त्या निकालास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तापस नियोगी खटल्याच्या निकालानुसार पोलिसांना तपासादरम्यान बँक खाती गोठविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे गुन्ह्याशी संबंधित संपत्ती जप्त करण्याचादेखील अधिकार पोलिसांना आहे, असा युक्तिवाद करण्यात आला. मात्र, न्यायालयाने सुनावणीदरम्यान हा युक्तिवाद मान्य केला नाही. पोलिसांना असे अधिकार दिल्यास त्याचा गैरवापर होऊ शकतो, असे निरिक्षण न्यायालयाने नोंदविले. न्यायमूर्ती दीपक गुप्ता आणि न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने राज्य सरकारचा दावा फेटाळून लावत भारतीय दंडविधान संहितेच्या कलम १०२ अन्वये पोलिसांना प्रकरणाचा तपास करताना अचल संपत्ती करण्याचा अधिकार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here