चिन्मयानंद यांच्यावर आरोप करणा-या पीडित मुलीला एसआयटीने घेतले ताब्यात

0

नवी दिल्ली : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप करणा-या पीडित मुलीला एसआयटीने ताब्यात घेतले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तत्पूर्वी, पीडितेने शाहजहांपूर येथील स्थानिक न्यायालयात अटकेपासून सूट मिळण्यासाठी अपील केले होते. मात्र, न्यायालयात याचिका दाखल करण्याआधीच पीडितेला एसआयटीने अटक केली. तसेच, पोलिसांनी पीडित महिलेविरोधात खंडणीचा गुन्हादेखील दाखल केल्याचे सुत्रांकडून समजते आहे. स्वामी चिन्मयानंद यांच्याविरूद्ध लैंगिक छळ केल्याच्या आरोपप्रकरणी पीडिते महिने अलाहाबाद उच्च न्यायालयातही आपल्या अटकेवर स्थगिती मिळावी यासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने सोमवारी या अर्जावर दिलासा देण्यास नकार दिला होता. शुक्रवारी अटक झालेल्या स्वामी चिन्मयानंद यांना सोमवारी शाहजहांपूर कारागृहातून लखनऊच्या इस्पितळात नेण्यात आले. त्याठिकाणी हृदयविकाराच्या समस्येसाठी त्यांच्यावर अँजियोग्राफी करण्यात आली. या प्रकरणाचा तपास करणार्‍या विशेष तपास पथकाने (एसआयटी) सीलबंद लिफाफ्यात आपला अहवाल दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सादर केला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here