रत्नागिरी विमानतळाची पूर्तता राज्य सरकारवर अवलंबून : सुरेश प्रभू

0

रत्नागिरी : भूसंपादनाचे काम राज्य सरकारने पूर्ण केल्यानंतरच रत्नागिरी विमानतळाचे काम पूर्ण होऊ शकेल. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी माजी विमान वाहतूक मंत्री आणि खासदार सुरेश प्रभू यांना तसे कळविले आहे. सुरेश प्रभू यांनी आज रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. पुरी यांच्याशी केलेल्या पत्रव्यवहाराला त्यांनी दिलेल्या उत्तराची प्रत पत्रकारांना दिली. त्यामध्ये हे नमूद करण्यात आले आहे. श्री. पुरी यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की रत्नागिरीतील विमानतळ भारतीय तटरक्षक दलाकडे आहे. उडान योजनेमध्ये या विमानतळाचा समावेश झाला आहे. या विमानतळाबाबत एअरपोर्टस अॅथोरिटी ऑफ इंडिया आणि राज्य शासनाने स्थापन केलेल्या महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीमध्ये ५ मार्च २०१९ रोजी सामंजस्य करार झाला आहे. त्यानुसार रत्नागिरीच्या विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली अतिरिक्त धावपट्टी आणि अन्य कामांसाठी आवश्यक असलेली जमीन संपादन करण्याचे काम महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. ही कंपनी नोडल एजन्सी म्हणून भूसंपादनाचे काम करणार आहे. त्याकरिता २६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कंपनी रत्नागिरीच्या जिल्हा प्रशासनाशी भूसंपादनाबाबत संपर्कात आहे. आवश्यक भूसंपादन झाल्यानंतर रत्नागिरी विमानतळ विकसित करणे आणि तेथून विमान वाहतूक सुरू करणे या गोष्टी अवलंबून आहेत, असे श्री. प्रभू यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:33 PM 05-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here