गावागावांतील शेतकऱ्यांना सक्षम करणार : खा. सुरेश प्रभू

0

राजापूर : शेती आणि शेतकरी हा देशाचा आर्थिक कणा असून परिवर्तन केंद्राच्या माध्यमातून कोकणातील तालुक्यातील गावागावांतील शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन आर्थिक सक्षम करण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी राजापूर येथे केले. श्री. प्रभू राजापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी शहरातील राजापूर हायस्कूलच्या कलामंदिर सभागृहामध्ये त्यांनी परिवर्तन केंद्राच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर माजी आमदार प्रमोद जठार, भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, तालुकाध्यक्ष अभिजित गुरव, राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष डॉ. छाया जोशी आदी उपस्थित होते. यावेळी श्री. प्रभू यांनी परिवर्तन केंद्राच्या माध्यमातून बचत गटाद्वारे महिला आर्थिक सक्षमीकरणाची चळवळ अद्यापही सुरू असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, राजापूरची गंगा दर तीन वर्षांनी येते. मात्र सामाजिक परिवर्तनासह राजापूरवासीयांच्या आयुष्यात आर्थिक आणि सर्वांगीण विकासाची अपेक्षित असलेली गंगा अद्यापही आलेली नाही. परिवर्तन केंद्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह साऱ्यांचा स्वप्नवत आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्ण भारत घडविण्यासाठी सार्यांतनी एकत्रित प्रयत्न करू या. रत्नागिरी जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या राजापूर तालुक्यामध्ये अद्यापही विकासाची गंगा वाहिलेली नाही. रस्ते, वैद्यकीय आदी पायाभूत सुविधांचे प्रश्नू अद्यापही प्रलंबित आहेत. स्थानिक लोकांच्या हाताला काम अन् रोजगार नाही. केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध उपक्रम आणि विकासकामे करून त्याची पूर्तता करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासनाने सार्यांलना आत्मनिर्भरतेचा संदेश दिला आहे. एक महिला आत्मनिर्भर झाल्यास कुटुंब आणि पर्यायाने समाज आत्मनिर्भर होतो. मात्र निवडणुका आणि जागतिक महिला दिनीच महिलांच्या भवितव्याचा विचार केला जातो. हे चित्र बदलणे गरजेचे आहे. भविष्यात नोकऱ्या मिळणे कठीण आहे. त्यामुळे नोकरी आणि जीवनाचा उद्धार यांची सांगड घालणे गरजेचे आहे. हाताला काम दिल्यास त्यातून कुटुंबाचे आणि समाजाचे परिवर्तन होणार आहे. परिवर्तन केंद्राच्या माध्यमातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये काम करून दोन जिल्हेच नव्हे, तर देश आत्मनिर्भर बनवू या, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:02 PM 06-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here