मुंबई : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महत्वाच्या तलावांपैकी तानसा तलाव आज (ता.२५) दुपारी 2.30 वाजता ओसंडून वाहू लागला. या तलावातून मुंबईला दररोज सरासरी 450 दशलक्ष लिटर्स पाण्याचा पुरवठा होतो. 12 जुलैला सायंकाळी 7 वाजता तुळसी तलाव वाहू लागला होता. तानसा वाहू लागल्यामुळे पालिकेच्या जलअभियंता विभागातील अभियंता व कर्मचाऱ्यांनी पेढे वाटून आपला आनंद व्यक्त केला. दरम्यान मोडक सागर तलावातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्यामुळे हा तलावही लवकर वाहू लागेल असा विश्वास जलअभियंता विभागाने व्यक्त केला.
