राजापूर ग्रामीण रुग्णालयात एकच डॉक्टर; रुग्ण तपासणीवर मोठा ताण

0

राजापूर : तालुक्यातील महत्वपूर्ण अशा राजापूर ग्रामीण रुग्णालयात एकच डॉक्टर कार्यरत असल्याने रुग्ण तपासणीवर मोठा ताण पडत असून शासनाने तत्काळ आणखी काही डॉक्टरची तातडीने नियुक्ती करावी, अशी मागणी आता नागरिकांमधून करण्यात येत आहे. तालुक्यात राजापुर शहरासह पूर्व परिसरात रायपाटण तेथे ग्रामीण रुग्णालय असून मागील काही वर्षांपासुन अपूर्ण वैद्यकीय अधिकारी यामुळे दोन्ही शासकीय रुग्णालयातील अनास्था समोर आली होत. त्यामध्ये रायपाटण ग्रामीण रुग्णालयात यापूर्वी दोन डॉक्टर्स कायमस्वरुपी उपलब्ध करुन देण्यात आल्याने तेथील रुग्णांची परवड दूर झाली आह. मात्र, राजापुर ग्रामीण रुग्णालयातील स्थितीत अजिबात फरक पडलेला नाही. या पूर्वी काही डॉक्टर्स येथे कार्यरत होते. मात्र, काही कारणास्तव ते सोडून गेल्याने सध्या राम मेस्त्री हे एकमेव डॉक्टर राजापूर रुग्णालयात कार्यरत आहेत गेला आठवडा ते दिवस-रात्र रुग्णांची तपासणी करीत आहेत. तालुक्यातील महत्वपूर्ण रुग्णालय असल्याने या रुग्णालयात कायम गर्दी असते मागील काही महिने ताप, सर्दी, खोकला यासह अन्य आजारांचे रुग्ण कायम येत असून त्यामुळे रुग्णतपासणी करताना तारेवरील कसरत करावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे. या पूर्वी या रुग्णालयात चार ते पाच डॉक्टर्सकायमस्वरुपी कार्यरत असायचे. मात्र,मात्रमागील काहीमहिन्यांत चांगले डॉक्टर्स सोडून गेल्यामुळे राजापेची रुग्णसेवाच डायलिसीसवर येऊन पडली आहे सातत्याने मागणी करुनही शासन व आरोग्य प्रशासन लक्ष देत नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील महत्वपूर्ण अशा शासकीय रुग्णालयात अवश्यक असलेल्या डॉक्टर्सची पूर्तता करावी तसेच अवश्यक त्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.

HTML tutorial




LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here