खोडदे येथे विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू

0

आबलोली : गुहागर तालुक्यातील खोडदे येथे ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीमध्ये पडून बिबट्याचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी पहाटे सहा वर्षे वयाचा नर जातीचा बिबट्या भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. भर वस्तीत बिबट्या विहिरीत पडला असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच विभागीय वनाधिकारी दीपक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण परिक्षेत्र वनाधिकारी राजेंद्र पाटील, गुहागर वनपाल संतोष परशेट्ये, रानवी वनरक्षक अरविंद मांडवकर घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थ सतिश पालकर यांनी विहिरीत उतरून ग्रामस्थांच्या सहकार्याने बिबट्याला बाहेर काढले. वनविभागाचे अधिकारी, पोलिस पाटील, सरपंच,तलाठी, ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत पंचनामा करून मृत बिबट्याचे शव विच्छेदनासाठी पशू वैद्यकीय दवाखाना चिपळूण येथे पाठविण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:21 PM 06-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here