खारमध्ये पाच मजली इमारतीचा भाग कोसळल्याने एका चिमुकलीचा मृत्यू

0

मुंबई : खार रोड पश्चिममधील पूजा अपार्टमेंट या पाच मजली इमारतीचा काही भाग खार रोड क्र. 17वरील रस्त्यावर  कोसळ्याने एका चिमुकलीला जीव गमवावा लागला आहे. खार रोड पश्चिम येथील पूजा अपार्टमेंट या पाच मजली इमारतीच्या जिन्याचा भाग आज(मंगळवारी) दुपारी 1.15च्या सुमारास कोसळला होता. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 10 वर्षाची माही मोटवाणी अडकली होती. माहीला ढिगाऱ्यातून बाहेर काढल्यानंतर तात्काळ लिलावती रुगणालयात हलविण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. तसेच सुरेखा भानुसाहेब लाेखंडे (स्त्री/ 40 वर्षे ) आणि भावना वसंत आंचन (स्त्री/ 50 वर्षे) जखमी झाले असून त्यांना भा.भा. रुग्णालयात उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here