बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आजवर बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. अमिताभ बच्चन यांची निवड दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. प्रकाश जावडेकर यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन गेल्या अनेक वर्षांपासून आपले मनोरंजन करत आहेत. आपल्या जवळजवळ दोन पिढ्यांना त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली आहे. त्यांची यंदाच्या दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या निर्णयामुळे संपूर्ण देश तसेच देशाबाहेर असणारे अमिताभ यांचे चाहतेदेखील खूश होतील. त्यांना या पुरस्कारासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
