राजापूर : आ.राजन साळवी यांनी आपल्या मतदार संघामध्ये सन २०१४ ते सन २०१९ पर्यंत केलेलया विकास कामांचा लेखाजोखा अहवालाचे प्रकाशन आज मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या शुभ हस्ते व खा.विनायक राऊत यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
सदर अहवालामध्ये आमदार राजन साळवी यांनी आजतागायत केलेला महत्वपुर्ण कामांचा तपशिल असुन त्यामध्ये त्यांनी अणुऊर्जा प्रकल्प विरोधात केलेले आंदोलन तसेच नाणार येथील रिफायनरी प्रकल्प रदद होणेसाठी केलेले आंदोलने तसेच प्रकल्पा विषयी,आरोग्य विषयी,रखडलेलया पाणी योजनां विषयी,पर्यटन विषयी, घरबांधणी घरदुरुस्ती अधिकार ग्रामपंचायतींना मिळणे संदर्भात,कोकणामध्ये मत्स्य विद्यापीठ होणे इत्यांदी संदर्भात विधानसभेमध्ये विविध आयुधांद्वारे उपस्थित केलेले मुददे व त्याअनुषंगाने झालेले महत्वपुर्ण निर्णय सदर अहवालामध्ये सादर करणे आला आहे. तसेच सुशिक्षित बेरोजगारांना संधी मिळणेच्या अनुषंगाने मतदार संघामध्ये प्रदुषण विरहित एम.आय.डी.सी. उभारणाचा प्रस्ताव सादर करण्यात आला असुन पाच वर्षामध्ये रु.४०३ कोटी २९ हजार ७३९ रुपये इतकी विकास कामे करणेत आली असलेचे लिहण्यात आले आहे.
आ.राजन साळवी यांनी केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा अहवाल पाहता उध्दव ठाकरे यांनी मुक्तकंठाने कौतुक केले व आ.राजन साळवींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सदर अहवाल प्रकाशनाच्या वेळी आ.राजन साळवी समवेत उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर,विधानसभा क्षेत्रप्रमुख जयसिंग माने,संगमेश्वर तालुका संपर्कप्रमुख राजेश शेलार,लांजा तालुकाप्रमुख संदिप दळवी,सिंधुदुर्गचे संजय पडते,दादरचे माजी शाखाप्रमुख प्रवीण शेटये,सुधीर मोरे,भांबेड विभागसंपर्कप्रमुख मनोहर लांबोर आदी उपस्थित होते.
