उदयनराजे रडले, पवारसाहेब वडीलस्थानी, त्यांच्याविरुद्ध लढणार नाही!

0

सातारा : राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपवासी झालेल्या उदयनराजे भोसले (Sharad Pawar vs Udayanraje Bhosale) यांच्या डोळ्यात आज पाणी आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांबाबत विचारलेल्या प्रश्नावर उदयनराजेंच्या (Sharad Pawar vs Udayanraje Bhosale) डोळ्यात पाणी आलं. ते साताऱ्यात बोलत होते.

HTML tutorial

उदयनराजे म्हणाले, “शरद पवार मला वडिलांच्या स्थानी आहेत. लोकसभा निवडणुकीला जर शरद पवार उभे राहिले तर मी उभा राहणार नाही. फक्त पवार साहेंबांनी त्यांचा दिल्लीतला बंगला आणि गाडी मला वापरायला द्यावी”

“मी सांगतो ना. ते आदरणीय काल पण होते, आज पण आहेत आणि भविष्यातही असतील.

ते जर उभे राहिले, तर मी फॉर्म भरणार नाही. फक्त एकच त्यांनी करावं, दिल्लीतला बंगला आहे ना, गाडी आहे, तेवढी मुभा आपल्याला द्यावी”, असं उदयनराजे भोसले म्हणाले.

साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणूक लांबणीवर पडल्याच्या शक्यतेने ‘गॅसवर’ असेलल्या उदयनराजे भोसले यांना दिलासा मिळाला आहे. विधानसभा निवडणुकीसोबतच साताऱ्यातील लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक (Satara Loksabha Bypoll Declared) जाहीर करण्यात आली . 21 ऑक्टोबरला सातारा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचं मतदान होणार असून विधानसभेसोबतच म्हणजेच 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here