अमित शहा यांचा मुंबई दौरा रद्द  युतीच्या चर्चेला पूर्णविराम ?

0

मुंबई : अमित शहा यांचा गुरवारी होणारा मुंबईचा दौरा रद्द झाला आहे. त्यामुळे भाजपा शिवसेना युतीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाल्याचे मानले जात आहे. शिवसेनेबरोबर युती करून निवडणूक लढवण्यास भाजपातील एका मोठ्या वर्गाचा विरोध होता, तो मान्य करून भाजपाने एकला चलोची भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.

IMG-20220514-WA0009

शिवसेनेला युती करण्यास राजी करण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्यावेळी भाजपाचे तत्कालीन अध्यक्ष अमीत शहा उध्दव ठाकरे यांना भेटणसाठी मातोश्रीवर गेले होते. भाजपाच्या नुकत्याच झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी अमित शहा आले असता त्दयांनी युतीबाबत भाष्य करण्याचे खुबीने टाळले होते. तर महाजनादेश यात्रेच्या समारोप प्रसंगी उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली होती.

तेंव्हाच राजकीय निरीक्षकांनी युती होणार नसल्याचे अनुमान काढले होते.

या पार्श्‍वभूमीवर उध्दव ठाकरे मात्र युती होणारच असे सांगत होते. तर सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी अगामी 24 तास युतीच्या भविष्यासाठी महत्वाचे असल्याचे विधान केले होते. त्यातच अमित शहा यांनी मुंबईचा दौराच रद्द केल्याने युतीची चर्चा पुढे सरकण्याची शक्‍यता मावळल्याचे राजकीय क्षेत्रात मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here