मुंबई : थोड्या विश्रांतीनंतर परतीच्या पावसाने मुंबई शहर, उपनगरांसह पुणे, कोल्हापूर भागाला जोरदार तडाखा दिला. मुंबईत आज पहाटेपासून पाऊस सुरु आहे. पुण्यात रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागांला पावसाने झोडपून काढले. मुंबईसह ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवलीत मुसळधार पाऊस सुरू आहे. लातूर, सातारा, बीड जिल्ह्यातही पाऊस झाला आहे. सांगली जिल्ह्यातील काही भागांत पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे येथील विटा- कराड महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. खानापूर तालुक्यातही दमदार पाऊस सुरू आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवडला दोन दिवस मुसळधार पावसाने झोडपले. विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पडलेल्या या पावसामुळे अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. दरम्यान, जिल्ह्याच्या काही भागांतही पावसाने दमदारहजेरी लावली.
