“सर्वप्रथम पंतप्रधान मोदींना लस देण्यात यावी, नंतर आम्ही घेऊ”

0

काही दिवसांपूर्वी भारतानं सीरम इन्स्टीट्यूट आणि भारत बायोटेकच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसींच्या आपात्कालिन वापरास परवानगी दिली. परंतु त्यानंतर लसींवरूनही देशात राजकारणाला सुरूवात झाली आहे. यापूर्वी लसीच्या सुरक्षिततेबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. दरम्यान, आता राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे मोठे सुपुत्र आणि माजी आरोग्यमंत्री तेजप्रताप यादव यांनी लसीकरणावरून पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीवर यापूर्वी मुलायम सिंह यादव यांचे सुपुत्र आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. आता तेजप्रताप यादव यांनीदेखील त्यांच्या सूरात सूळ मिसळला आहे. “कोरोनाची जी लस आली आहे ती सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात यावी. त्यानंतर आम्ही ती लस घेऊ,” असं तेजप्रताप यादव म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:18 PM 08-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here