येत्या काही दिवसांत देशवासियांना कोरोना लस मिळेल : केंद्रीय आरोग्यमंत्री

0

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोनाच्या लसीसंदर्भात मोठे विधान केले आहे. हर्षवर्धन म्हणाले की, येत्या काही दिवसात ‘आपल्या देशवासियांना’ लस उपलब्ध होईल. सरकार लसीकरण कार्यक्रमाची सर्व माहिती राष्ट्रीय स्तरापासून ते तळागाळापर्यंत उपलब्ध करुन देणार आहे. चेन्नई येथील रूग्णालयात सुरु असलेल्या ड्राय रनला भेट देण्यासाठी आलेल्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, ही लस प्रथम आरोग्य कर्मचार्‍यांना आणि नंतर फ्रंटलाइन कर्मचार्‍यांना दिली जाणार आहे. आरोग्यमंत्री म्हणाले, ‘कमी कालवधीत लस तयार करण्यात भारताने चांगली आघाडी घेतली आहे. येत्या काही दिवसात आम्ही ही लस आपल्या देशवासियांना देऊ शकू. प्रथम आरोग्य कर्मचारी आणि नंतर फ्रंटलाइन कामगारांना ही लस दिली जाईल. ड्राय रन वेळी लाखो आरोग्य कर्मचार्‍यांना लस देण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे, ही प्रक्रिया अद्याप सुरू आहे.’

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:28 PM 08-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here