ॲड. दीपक पटवर्धन व बाळ माने यांचा १५ ग्रामपंचायतींचा प्रचार दौरा

0

रत्नागिरी : भाजपा पुरस्कृत पॅनलच्या प्रचारासाठी भाजपाने व्यूह रचना सज्ज केली असून विविध स्तरांवर प्रचार यंत्रणा राबवण्यात येत आहे. या यंत्रणेने पटवर्धन आणि माने यांच्या दौऱ्याचे नियोजन केले आणि पटवर्धन-माने यांनी गेले दोन दिवस झंझावाती प्रचार दौरा केला. पावस, गोळप, भाट्ये, नाखरे, गावखडी, मेरवी असा दौरा करून ग्रामपंचायतीचे भाजपा पुरस्कृत उमेदवार व कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी तसेच काही महत्त्वपूर्ण ग्रामस्थांच्या भेटी करत कार्यकर्त्यांना भक्कम आधारावर सक्रीय करण्याचे काम या दौऱ्याने साधले. दोघांच्या संयुक्त दोऱ्याने एकसंघ भाजपा संघटनांचे मजबूत चित्र कार्यकर्त्यांच्या अनुभवास आले. बसणी, कोतवडे, ओरी, नेवरे, गणपतीपुळे, रीळ, वरवडे, खंडाळा, चाफे असा दौरा करत या ग्रामपंचायतीं मध्ये भाजपाचे बळ एकवटण्याचा प्रयत्न सफल झाला. तसेच सेनेमध्ये असलेली दुफळी, असंतोष या संदर्भाने अनेक अनुभव उभय नेत्यांना आले. परत एकदा सर्व शक्ती एकवटून ग्रामपंचायत निवडणुकी माध्यमातून भा.ज.पा.ची ताकद वाढवण्याचा प्रयत्न होताना दिसत असल्याने कार्यकर्ते उत्साहात आहेत. यावेळी भाजपाने तालुक्यात ३०५ उमेदवार उभे केले असून काही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. भाजपा ही निवडणूक बहुतांशी स्वबळावर लढवत आहे. पुढील दोन दिवस माने-पटवर्धन यांचा दौरा सुरू राहणार असून आता खाडीपट्यात प्रचार दौरा होणार आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा लक्षणीय यश संपादन करेल. भाजपाची संघटनात्मक ताकद वाढलेली दिसेल व किमान २०० च्या घरात सदस्य निवडून आपण गतवेळच्या दुप्पट ग्रामपंचायती जिंकण्याचा निर्धार भाजपा कार्यकर्त्यांनी केला आहे, असे ॲड. दीपक पटवर्धन जिल्हाध्यक्ष भाजपा यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:38 PM 08-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here