ब्रेकिंग: देशातील १० हजार नागरिकांची १० कोटींची फसवणूक करणाऱ्या टोळीतील एका आरोपीच्या मुसक्या रत्नागिरीतून आवळल्या

0

रत्नागिरी : एच. पी. गॅसची एजन्सी मिळवून देण्याची बतावणी करून २ वेबसाईटच्या माध्यमातून देशातील १०,५३१ नागरिकांची अंदाजे एकूण रु. १० कोटी १३ लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी सायबर पोलीस ठाणे, मुंबई यांनी एका टोळीच्या मुसक्या आवळल्या असून यातील एका आरोपीला रत्नागिरी पोलिसांच्या मदतीने जयगड येथून ताब्यात घेण्यात आले आहे. तर या गुन्ह्यातील २ पुरुष व एका महिलेला पटना बिहार येथून अटक करण्यात आली आहे. जनतेला गॅस एजन्सीची डीलरशिप देण्याचे आमिष देत हि फसवणूक करण्यात आली आहे. या टोळीकडून एकूण ५ मोबाईल १ लॅपटॉप व १ लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आला आहे. ऑनलाईनफसवणूक करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असतानाच या टोळीस जेरबंद करून पर्दाफाश करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. मात्र अशा गुन्ह्यांचे धागेदोरे कोकणात तर नाहीत ना ? पळालेल्या आरोपींना कोकणात सुरक्षित निवारा तर मिळत नाही ना ? असे प्रश्न आता या गुन्ह्यातील एका आरोपीच्या कोकणात मिळण्याने निर्माण झाले आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
06:57 PM 08/Jan/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here