ग्रामपंचायत निवडणुकीची सर्व सूत्र बाळासाहेब मानेंकडे असती तर भाजपला काही ठिकाणी यश मिळालं असतं : उदय सामंत

0

🔳 “बाळ माने चांगले काम करत असताना काहींनी षडयंत्र करून त्यांना बाजूला केलं”

रत्नागिरी : बऱ्याच दिवसांनी आज भाजप संपर्क कार्यालयात माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने गट आणि आमदार प्रसाद लाड, विद्यमान जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन एकत्रित दिसले व त्यांनी पत्रकार परिषद घेतली. नवीन आणि निष्ठावंत शिवसैनिक यांच्यातच निवडणूक सुरू आहे. स्थानिक आमदार आणि मंत्री यांच्या कार्यपद्धतीबाबत प्रचंड रोष आहे. त्यामुळे दुखावलेल्या आणि नाराज शिवसैनिकांच्या मागे मी ठाम उभा आहे असे वक्तव्य बाळासाहेब माने यांनी या पत्रकार परिषदेत केले. या टीकेला उत्तर देताना ना. उदय सामंत यांनी बीजेपीच्या दुखऱ्या जागेवरच नेमके बोट ठेवले आहे. ते म्हणाले कि बाळासाहेब माने हे माझे चांगले मित्र, अनेक वेळी मी त्यांचा सल्ला घेतलाय. सगळी ग्रामपंचायत निवडणुकीची सूत्र त्यांच्या कडे असती तर काही ठिकाणी भाजपला यश मिळालं असत.
आजची पत्रकार परिषद त्यांच्या मनाविरुद्ध होती ते त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. त्यांनी माझ्यावर टीका केली अजिबात राग आला नाही कारण ते नाईलाजाने माझ्यावर बोलले हे मला माहित आहे. आजू बाजूच्या पदाधिकाऱ्यांना बर वाटावं म्हणून ते बोलले असावेत. मी बाळ मानेच मन ओळखू शकतो, प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे.
बाळासाहेब माने हे तालुक्या पुरते मर्यादित नाहीत. त्यांनी जिल्हाध्यक्ष असताना चांगलं काम केलं होतं. परंतु चांगल काम करत असताना काहींनी षडयंत्र करून त्यांना बाजूला केलं त्याचा फायदा आम्हाला जिल्ह्यात होत आहे. भाजप चे बाळासाहेब मानेंवर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते जिल्ह्यात आमच्या बरोबर आहेत. काम न करणार्यांना पद दिली जातात ही फार मोठी खदखद बीजेपी मध्ये आहे त्यामुळे अनेक ठिकाणी मनोमिलन घडवण्यासाठी बाळासाहेबांचा उपयोग निवडणुकी पुरता केला जात आहे हे त्यांनी ओळखावं एवढीच माझी त्यांना विनंती आहे. शिवसैनिक अठरा तारखेला उत्तर मतातून देतील असा विश्वास उदय सामंतांनी व्यक्त केला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
07:22 PM 08/Jan/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here