बेहिशेबी संपत्तीची अनेकांना धडकी भरली

0

रत्नागिरी : बेहिशेबी संपत्तीप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकार्‍यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ज्यांच्याविरुद्ध अशाच पद्धतीची चौकशी सुरू आहे त्यांना धडकी भरली आहे. यामध्ये राजापूरचे तत्कालीन तहसीलदार, मंडणगडातील दुय्यम निबंधक, दोन परिचारिका, जामदा आणि गडनदी पाटबंधारे प्रकल्पाच्या गैरव्यवहारातील अधिकार्‍यांचा समावेश आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या पाच वर्षांत काही कारवाया केल्या. यातील संशयित आरोपींच्या मालमत्तेची चौकशीही सुरू झाली. पाटबंधारेच्या दोन्ही धरण प्रकल्पातील गैरव्यवहाराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी पूर्ण केली असल्याची माहिती नव्यानेच रुजू झालेले विभागाचे पोलिस उपअधीक्षक नितीन विजयकर यांनी दिली. यासंदर्भात तज्ज्ञ समितीचा अहवाल येणे बाकी आहे. जामदा धरणाचे प्रकरण 2014 सालचे असून, गडनदी प्रकरण 2016 सालचे आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 2016 साली तत्कालीन तहसीलदार गुरुनाथ उन्हरे यांच्यासह 2017 साली मंडणगडातील दुय्यम निबंधक चंद्रकांत आंबेकर यांच्या संपत्तीबाबत चौकशी सुरू केली आहे. ही चौकशी अंतिम टप्प्यातील आली असून, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील परिचारिकांच्या संपत्तीची अशीच चौकशी सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून बेहिशेबी संपत्तीची चौकशी सुरू झाल्यानंतर तो संपूर्ण अहवाल ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस  अधीक्षकांकडे जातो. तेथून तो व्यवस्थापकीय संचालकांकडे जावून मंजूर होऊन आल्यानंतर पुढील कार्यवाही होते. अशाच पद्धतीने सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी अशोक नाचणकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील तीन महिला सदस्यांविरुद्ध नुकताच गुन्हा दाखल झाला आहे. या तिन्ही महिला शासकीय सेवेत आहेत.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here