बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनीच औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं : चंद्रकांत खैरे

0

छत्रपती संभाजी महराजांचं नाव औरंगाबादला देण्यात यावं, असं शिवसेनेनं म्हटलं होतं. मात्र या नामंतराच्या मुद्यावरून राजकारण चांगलंच पेटलं आहे. अशातच औरंगाबादचे माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्र्यांना एक विनंती केली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिवशी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावं अशी मागणी चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. औरंगाबादच्या नामांतराला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध नाही. कॉंग्रेसही विरोध करणार नाही. या मुद्द्यावरून महाविकास आघाडीमध्ये काहीही ही मतभेद होणार नाही, असंही खैरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, येत्या 23 जानेवरीला बाळासाहेब ठाकरेंची जयंती आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत खैरेंनी ही मागणी केली आहे. मात्र काँग्रेसने आपला विरोध जाहीरपणे दर्शवला आहे. त्यामुळे खैरेंच्या मागणीवर मुख्यमंत्री काय बोलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:34 PM 09-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here