नवि मुंबई: उरणच्या ओएनजीसी प्रकल्पातील गॅस लीक झाला असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची गंभीर दखल घेऊन सभोवलताचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाली असल्याची माहिती मिळालेली नाही. प्रकल्पात सध्या कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रकल्पातून बाहेर पडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आज बुधवारी(दी.२५) सकाळी नवी मुंबई येथे असणाऱ्या ओएनजीसी प्रकल्पामध्ये काम सुरू होते. दरम्यान गॅस लीक झाला असल्याची माहिती मिळाली. या घटनेची माहिती मिळताच प्रकल्पातील लोकांना बाहेर काढण्यात आले. गॅस लीक होण्याचे प्रमाण अधिक असल्याने तेथील कर्मचारी आणि नागरिकांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे सभोवलताचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी या प्रकल्पाला भीषण आग लागली होती. त्यावेळी या दुर्घटनेत चौघांचा होरपळून मृत्यू झाला होता. प्रकल्पातील एपीयू-3 या क्रमांकाच्या विभागात साठवून ठेवलेला अतिज्वालाग्राही नाफ्ता काही प्रमाणात साठवण टाकीतून ओव्हरफ्लो झाल्याने आग लागली होती.
