महेश मिलके स्विमिंग ग्रुपच्या जलतरणपटू यांची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेकरिता निवड

0

रत्नागिरी :

HTML tutorial

नुकत्याच 19 व 20 सप्टेंबर रोजी सातारा येथे पार पडलेल्या शालेय विभागाच्या जलतरण स्पर्धेमध्ये महेश मिलके स्विमिंग ग्रुपचे तीन जलतरणपटूंनी घवघवीत यश मिळवले. नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथमच या तिघांची निवड झाली आहे. त्यामध्ये करण महेश मिलके याने 50 मी. ब्रेस्ट स्ट्रोक प्रथम क्रमांक, 100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक द्वितीय क्रमांक आणि 50 मीटर फ्रीस्टाइल तृतीय क्रमांक मिळवला आहे. तनया महेश मिलके हिने पन्नास मीटर ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये प्रथम क्रमांक, 100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तर श्रावणी स्वप्नील खटावकर हिने 100 मीटर बटरफ्लाय द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

महेश मिलके स्विमिंग ग्रुपच्या तीन खेळाडूंनी विशेष नैपुण्य दाखवून स्पर्धेत आपलं नाव कमावून यश संपादन केलं त्याबद्दल रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेकडून तसेच पालकांकडून सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले. तसेच या खेळाडूंना स्पर्धात्मक खेळाचं प्रशिक्षण देणारे राष्ट्रीय जलतरणपटू महेश मिलके यांचे मार्गदर्शन लाभले त्याबद्दल पालकांनी तसेच जनतेने विशेष अभिनंदन केले व पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here