फडणवीस, राज ठाकरेंसह काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात

0

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील नेत्यांच्या सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर गृह विभागाकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह 11 जणांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, नारायण राणे यांच्यासह 16 जणांची सुरक्षा काढण्यात आली आहे. राज्यातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी गृह मंत्रालयाकडून पाच सदस्यीय समिती नेमण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालानंतर गृह विभागाने त्यांच्या सुरक्षेची फेररचना करून त्यानुसार अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेनुसार 11 जणांच्या सुरक्षेत कपात करण्यात, तर 16 जणांची सुरक्षा काढण्यात आली आहे. 13 नवीन व्यक्तींना सुरक्षा पुरविण्यात आली असून दोन जणांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

यांची सुरक्षा काढली

नारायण राणे यांची वाय प्लस सुरक्षा काढण्यात आली असून त्यांच्यासह सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील यांचीही सुरक्षा काढण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची वाय प्लस सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. त्याचप्रमाणे माजी मंत्री राजकुमार बडोले, आमदार प्रसाद लाड, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे.

यांना सुरक्षा

विधान परिषद अध्यक्ष रामराजे निंबाळकर, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांना वाय प्लस सुरक्षा एस्कॉर्टसह पुरविण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सौ. सुनेत्रा पवार, आमदार वैभव नाईक, युवा सेना सरचिटणीस वरुण सरदेसाई यांना एक्स सुरक्षा तर राज्यमंत्री संदीपान भुमरे, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना वाय सुरक्षा पुरविण्यात आली आहे.

यांच्या सुरक्षेत वाढ

सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. वकील निकम यांना वाय प्लसवरून झेड आणि काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांना वाय प्लस वरून वाय प्लससह एस्कॉर्टची सुरक्षा पुरविण्यात आली आहे.

यांच्या सुरक्षेत कपात

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस – झेडऐवजी वाय प्लस सुरक्षा

अमृता फडणवीस – वायऐवजी एक्स सुरक्षा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे – झेडऐवजी वाय प्लस

लोकायुक्त एम.एल. ताहिलियानी – झेडवरून वाय सुरक्षा

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले – वाय ऐवजी वायरलेस

आमदार आशीष शेलार – वाय प्लस वरून वाय सुरक्षा

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:40 AM 11-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here