मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर

0

नवी मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी भाजप- शिवसेना युतीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र, आज, स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ८६ व्या जयंतीनिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र आले. या कार्यक्रमात ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांची ८६ वी जयंती व माथाडी कामगारांचा भव्य मेळावा एपीएमसी मार्केट (कांदा-बटाटा मार्केट) येथे आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, महापौर जयवंत सुतार, सिडकोचे अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मंदा म्हात्रे, आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार संदीप नाईक व विविध मान्यवरांची उपस्थिती होती. भाजप-शिवसेना युतीत सर्व काही आलबेल आहे, असे वाटत असताना जादा जागा मिळविण्यासाठी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतल्याने युतीत तणाव निर्माण झाला आहे. भाजपने शिवसेनेला १२० जागा देण्याची तयारी दाखवली होती. मात्र, शिवसेनेने आणखी पाच ते सहा जागांची मागणी केली आहे; तर भाजपनेही १२० पेक्षा जास्त जागा देण्यास नकार दिल्याने युतीच्या चर्चेचे घोडे अडले आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here