दहावी बोर्डाच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

0

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे येत्या दहावीची परीक्षा एप्रिल-मे महिन्यात घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता परीक्षेसाठी 25 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. दहावी परीक्षेच्या नियमित विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास यापूर्वी 23 डिसेंबर ते 11 जानेवारी अशी मुदत देण्यात आली होती. मात्र, परीक्षेसाठी नियमित शुल्कासह दि. 12 ते 25 जानेवारीपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. याच कालावधीत माध्यमिक शाळांनी पुरर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन अर्ज भरून घ्यावेत. तसेच, दि. 1 फेब्रुवारीपर्यंत माध्यमिक शाळांनी चलन डाऊनलोड करून चलनाद्वारे बॅंकेत शुल्क भरावेत, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
5:02 PM 11-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here