यापुढे आपण कोणतीही निवडणूक लढवणार नाही; राजन पोकळे

0

सावंतवाडी ः दीपक केसरकर हे गृह, नियोजन, वित्त राज्यमंत्री व पालकमंत्री असतानाही त्यांच्या मंत्रीपदाचा योग्य तो फायदा सावंतवाडी शहराच्या विकासासाठी येथील नगरपरिषदेच्या लोकप्रतिनिधींना करुन घेता आला नाही. त्यामुळे शहराचे मोठे  नुकसान झाले, अशी टीका माजी उपनगराध्यक्ष  राजन पोकळे यांनी केली. केवळ राजयोग असून चालत नाही, तर मिळालेली खुर्ची टिकवून ठेवण्याची क्षमता असायला हवी, असा टोलाही पोकळे यांनी लगावला. यापुढे आपण कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 
पोकळे यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला.  शिवसेना शहरप्रमुख तथा नगरपरिषदेच्या आरोग्य व क्रीडा सभापती खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, नगरसेविका आनारोजीन लोबो उपस्थित होते. पोकळे म्हणाले, दीपक केसरकर नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करून गेले. त्यांनी आपल्या काळात मोठ्या प्रमाणात शहराचा विकास केला. मात्र, त्यांच्या मंत्रिपदाचा म्हणावा तसा फायदा नगरपरिषद पदाधिकार्‍यांना करून घेता आलेला नाही. करोडो रुपयांचा निधी मिळून सुद्धा शहर विकासात मागे राहिले आहे. याठिकाणी राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न नाही. परंतु केसरकर यांच्या मदतीने शहरात निर्माण झालेले अनेक प्रश्‍न सोडविणे गरजेचे होते. परंतु तसे झाले नाही. अंडरग्राउंड वीज वाहिन्यांसारखी मोठी योजना रखडली आहे. त्यामुळे तब्बल दहा कोटी रुपये परत जाण्याची भीती त्यांनी व्यक्‍त केली. केवळ कार्यालयीन वेळेत काम केले म्हणून विकास झाला असे म्हणता येणार नाही.  दीपक केसरकर नगराध्यक्ष असताना त्यांनी रात्री तीन वाजेपर्यंत नगरपरिषदेत राहून काम केले. त्यामुळे सावंतवाडीचे  नाव राज्यभर नेले, असेही पोकळे म्हणाले.  

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here