कृषी कायद्याबाबत मोदी सरकार कोर्टाचीही दिशाभूल करेल : राजू शेट्टी

0

कराड : सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला दणका देत कृषी कायद्यांना अंतरिम स्थगिती दिली आहे. यावरुन राजकीय वर्तृळात चर्चा सुरु झाल्या आहेत. यावरुन अनेकांनी निर्णयाचे स्वागत केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भाष्य केले आहे. सुप्रीम कोर्टाने कृषी कायद्यांसाठी एक समिती गठीत केली आहे. या समितीत कृषी कायद्यांना समर्थन करणाऱ्यांनाच नेमले आहे, त्यामुळे शेतकरी वर्गात असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर अदानी, अंबानीला अजून काही या कृषी कायद्यात दुरुस्ती करुन घ्यायची आहे ती घ्या आणि कायमचेच शेतकऱ्यांच्या बोकांडी हे कायदे बसवून देऊयात असे कोर्टाला म्हणायचे आहे का अशी शंका राजू शेट्टींनी व्यक्त केली आहे, कराड येथे पत्रकारांशी ते संवाद साधत होते. सुप्रीम कोर्टाने कृषी कायद्याला स्थगिती दिल्यामुळे आम्ही जी मागणी करत होतो ती योग्य होती यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आमची भूमिका कोर्टाने मान्य केली आहे. मात्र, मोदी सरकार सुप्रीम कोर्टाची दिशाभुल करुन आम्हाला मुर्ख बनवायचा प्रयत्न करत आहे का अशी भीती वाटत आहे, असेही राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:48 PM 12-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here