जिल्हा बँकेला ‘बेस्ट प्रोडक्ट इनोव्हेशन’ पुरस्कार प्राप्त

0

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला बँकिंग फ्रंटीयर्सकडून सन २०१८-१९ चा ‘बेस्ट प्रोडक्ट इनोव्हेशन पुरस्कार’ प्राप्त झाला. हा पुरस्कार सोहळा गोवा येथे आयोजित करणेत आला होता. पुरस्कार वितरणासाठी गोवा राज्याचे मंत्री गोविंद गावडा, कर्नाटक राज्याचे माजी मंत्री एच. के. पाटील, तसेच बँकिंग क्षेत्रातील अन्य मान्यवर उपस्थित होते. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मागील चार वर्षांत महाराष्ट्र शासन पुरस्कार २०१५-१६ – सहकारनिष्ठ पुरस्कार, बँकिंग फ्रंटियर्स पुरस्कार २०१६-१७ – बेस्ट एचआर पॅक्टीस व बेस्ट डिजिटल मार्केटींग, बँको पुरस्कार २०१६-१७, बँकिंग फ्राँटियर्स पुरस्कार २०१७-१८ – बेस्ट
चेअरमन व बेस्ट क्रेडिट ग्रोथ, महाराष्ट्र शासन पुरस्कार २०१७-१८ – सहकार भुषण पुरस्कार, बँकिंग फ्राँटियर्स पुरस्कार २०१८-१९ बेस्ट प्रोडक्ट इनोव्हेशन पुरस्कार मिळाले आहेत. पुरस्कारांचे श्रेय बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी बँकेचे सर्व संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी वर्ग तसेच जिल्ह्यातील बँकेचे असंख्य ग्राहक व हितचिंतक यांना दिले आहे.

IMG-20220514-WA0009


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here