कोरोना लसीकरण: पश्चिम बंगालला सर्वाधिक 10 लाख डोस

0

नवी दिल्ली : एकीकडे देशभरात 16 जानेवारीला लसीकरणासाठी सुरुवात होणार आहे. तर दुसरीकडे याच संधीचा आगामी निवडणुकांसाठी फायदा उठवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मुंबईत पहिल्या टप्यातील लसीकरणासाठी 1 लाख 39 हजार 500 कोव्हीशिल्ड लस दाखल झाल्या आहेत. मुंबईतील एफ दक्षिण विभागात बुधवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास या लसींना घेऊन कडेकोट पोलीस बंदोबस्तात एक व्हॅन मुंबईत दाखल झाली. आज महाराष्ट्रातील मुंबईसह 13 राज्यांमध्ये लसी पोहचवण्यात आल्या आहेत. यानंतर 14 जानेवारी पर्यत सर्व राज्यात 1.65 कोटी डोस पोहचवण्यात येणार आहेत. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्राला पहिल्या टप्यात 5 लाख 63 हजार डोस देण्यात येणार आहेत अशी माहिती महापालिकेने दिली होती परंतु त्यातील केवळ 1 लाख 39 हजार 500 चं डोस मुंबईत दाखल झाले आहेत तर दुसरीकडे पश्चिम बंगालला सर्वाधिक म्हणजे तब्बल 10 लाख डोस पाठवण्यात आलेत. त्यामुळेच आता विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:55 PM 13-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here