राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत जिल्ह्याला तब्बल ११ पदके

0

देवरुख : अमरावती येथे नुकत्याच पार पडलेल्या २२व्या महाराष्ट्र स्टेट मास्टर्स स्विमिंग चॅम्पियनशीप २०१९ राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत चार स्पर्धकांनी रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करताना तब्बल ११ पदकांची कमाई करीत रत्नागिरी जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. यास्पर्धेत रत्नागिरीतील ७६ वर्षीय शंकरराव मिलके यांनी तीन सुवर्ण पदकांसह एक रौप्य पदक पटकावत तरूणांसमोर नवा आदर्श ठेवला आहे. या चारही यशस्वी स्पर्धकांची दि.९ व १० नोव्हेंबर रोजी तेलंगाना राज्यातील सिकंदराबाद येथे होणाऱ्या सहाव्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धे साठी निवड करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यस्तरीय स्पर्धेत शंकरराव मिलके यांनी ५० मीटर फ्री स्टाईलमध्ये सुवर्ण पदक, १०० मीटर फ्री स्टाईलमध्ये सुवर्ण, ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये सुवर्ण व १०० ब्रेस्टस्ट्रोकमध्ये रौप्यपदक पटकावले. विवेक विलणकर यांनी ५० मीटर, १०० मीटर व २०० मीटर फ्री स्टाईलमध्ये प्रत्येकी सुवर्ण पदक तर ५० मीटर बँकस्ट्रोकमध्ये एक रौप्य पदक प्राप्त केले. मिलींद केतकर यांनी ५० मीटर बटरफ्लायमध्ये रौप्य पदक व रत्नाकर थत्ते यांनी ५० मीटर फ्री स्टाईल व५० मीटर बँकस्ट्रोकमध्ये प्रत्येकी कांस्य पदक मिळवले. अशाप्रकारे या चार स्पर्धकांनी ६ सुवर्ण, ३ रौप्य व २ कांस्य अशी एकूण ११ पदकांची लयलुट करत रत्नागिरी जिल्ह्याचे नाव रोशन केले. या चारही यशस्वी स्पर्धकांनी राज्यस्तरीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्यामुळे व राष्ट्रीय जलतरण स्पर्धे साठी या स्पर्धकांची निवड झाल्यामुळे त्यांचे रत्नागिरी जिल्हा जलतरण संघटना, विविध क्रीडा संघटना व जलतरण प्रेमींनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत..

HTML tutorial
LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here